माथेफिरु संतोष मानेला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

January 26, 2012 5:31 PM0 commentsViews: 7

26 जानेवारी

पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून 8 निष्पापांचे बळी घेणार्‍या संतोष मानेला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्यातल्या रस्त्यावर काल बेदरकारपणे एसटी चालवून आठ निष्पापांचे संतोषनं बळी घेतले होते. संतोष मानेला आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्यावेळेस त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पुणे बार असोसिएशनने संतोषचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोषने काल एसटीची एक बस पळवली आणि ही बस शहरात तासभर सैरभैर चालवली. यामध्ये 8 जणांचा बळी गेला आहे. आणि 27 जण जखमी झाले आहेत. संतोष मानेवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, संतोष मानेच्या या कृत्याबद्दल आणखी कोणाला काहीही माहिती असेल तर त्यांनी ती पोलीसांपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन तपास अधिकारी राजेंद्र मोहिते यांनी केलं आहे.

काल बुधवारी पुण्यात हैदोस घालणा-या संतोष मानेला आज पोलीस कोठडी देण्यात आली. पुण्यातल्या रस्त्यावर काल बेदरकारपणे एसटी चालवून 8 निष्पापांचे संतोषनं बळी घेतले होते. संतोषचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशननं घेतला आहे.

बेदरकारपणे गाडी चालवून 8 जणांचे जीव घेणार्‍या आणि 27 जणांना जखमी करणार्‍या संतोष मानेला गुरवारी दुपारी एक वाजता शिवाजी नगर कोर्टत हजर करण्यात आलं. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान असे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत.. म्हणजे 7 दिवसांचा पोलीस कोठडी देण्यात आली. कोर्टात जेव्हा संतोष मानेला प्रश्न विचारले, तेव्हा त्याने काहीही बोलण्यास नकार दिला. पुणे बार असोसिएशननंही निर्णय घेतलाय की कुणीही वकील त्याचं वकीलपत्र घेणार नाही.

बुधवारच्या घटनेचा तपास आता एसीपी राजेंद्र मोहिते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष मनोरुग्ण नाही. मग त्याने या घटनेचा कट रचला होता का, याची ते चौकशी करत आहे. 27 जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर होती. पण आता त्या तिघांची तब्येत धोक्याबाहेर आहे.

close