मराठी शाळा वाचवण्यासाठी मानवी साखळी

January 26, 2012 11:01 AM0 commentsViews: 4

26 जानेवारी

नाशिकमध्ये मराठी शाळेतल्या मुलांनी मराठी शाळांच्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. महाराष्ट्र शासनाने बृहत आराखड्याच्या निमित्ताने मराठी शाळांच्या मान्यता रोखल्या आहेत. त्या त्वरित देण्यात याव्यात आणि शाळांवर दाखल केलेल्या केसेस काढून घ्याव्यात या मागणीसाठी या शाळांनी हे आंदोलन केलं. हुतात्मा स्मारकात स्वातंत्र सैनिकांच्या उपस्थितीत मराठी शाळांच्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधी रस्त्यावर मोठा मानवी साखळी करून या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या मागण्या मांडल्या.

close