मालिकांमधल्या दागिन्यांना मिळतीय पहिली पसंती

November 21, 2008 5:31 AM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबर, नाशिकदिप्ती राऊतफूड, फॅशन, फन आणि फिल्म हे चार 'फ' सध्या सगळ्यांच्या तोंडी आहेत. हे शब्द घराघरात पोहोचले ते टीव्हीमुळं . आता तर कॉस्मेटिक्सच्या दुकानातही सिरीयल्समधल्या नायिकांचं अधिराज्य दिसतंय. कॉस्मेटीक्सच्या दुकानात पूर्वी बायका यायच्या तेव्हा एखाद्या पिक्चरमधल्या हिरोईनचा रेफरन्स द्यायच्या. आता मात्र वेगळीच मागणी आहे. बायकांना हवेत आपल्या आवडत्या मालिकांमधल्या नायिकांसारखे दागिने. त्यातही सध्या डीमांड आहे ती बालिका वधूमधल्या आनंदीच्या दागिन्यांची. 'आनंदीच्या दागिन्यांशिवाय क्योंकी मधल्या तुलसीचं मंगळसूत्र, कहानी घर घर की मधल्या पार्वतीची टिकली, कसोटी जिंदगीतल्या प्रियांकाचा नेकलेस, पार्वतीची फॅन्सी बिंदी, कशीश मधले इयरिंग या गोष्टींना अजूनही बायकांची खास पसंती आहे' असं विक्रेते सांगतात.अर्थात मराठी सिरीयल्सही यात मागे नाहीत. त्यांचे तर फक्त दागिनेच नाही, तर मिरीपीन, घड्याळंही प्रसिद्ध झाली आहेत. यामुळे दुकानदार भलतेच खूश आहेत. अर्थात मालिकांमधले दागिने एवढे लोकप्रिय आहेत, हे एकता कपूरला माहीत नाही म्हणून बरं आहे, नाहीतर ती पण एखादं कॉस्मेटीक्सचं दुकान उघडेल 'के' नावानं. आणि मग आमच्या मेनरोडवरच्या विक्रेत्यांच्या पोटावर पाय येईल.

close