बस अपघातात बळी गेलेल्या युवतीवर अंत्यसंस्कार

January 26, 2012 8:12 AM0 commentsViews: 2

26 जानेवारी

पुण्यात काल झालेल्या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेली श्वेता ओस्वाल हिच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.काल गुरुवारी संतोष माने या माथेफिरु बस ड्रायव्हरने एसटी बस पळवून धुमाकूळ घातला या अपघातात 9 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या अपघतात 28 वर्षीय श्वेता ओस्वाल हिने जगाचा निरोप घेण्याआधी तिनं नेत्रदानाची इच्छा बोलून दाखवली. गंभीर जखमी असलेल्या श्वेताला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण श्‍वेताला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. श्वेताचा मृत्यू ओढवला पण तिच्या कुटुंबीयांनी यातून सावरून तत्काळ तिचं नेत्रदान केलं. अपघाती मृत्यूपूर्वी नेत्रदानाचा निर्णय घेऊन श्वेतानं सगळ्यांसाठी एक आदर्शच घालून दिला.

close