जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध केवळ देखावा-भाई वैद्य

January 27, 2012 10:24 AM0 commentsViews: 16

27 जानेवारी

जैतापूर प्रकल्पाला होणारा शिवसेनेचा विरोध हा केवळ देखाव्यासाठी असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि माजी गृहराज्य मंत्री भाई वैद्य यांनी केला. तसेच सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधकांनाही जैतापूर प्रकल्पाच्या आडून आपला फायदा करून घ्यायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वोदय चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतल्या साखरीनाटे मध्ये जनहक्क परीषदेचं आयोजन केलं होतं. शेकडो मच्छीमारांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत उत्तराखंड मध्ये मानवी हक्कांसाठी लढाणार्‍या नेत्या राधा भट तसेच अनेक सर्वोदय चळवळीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हा परीषद निवडणुकांनंतर जैतापूर परिसरातल्या शेतकरी आणि मच्छीमारांकडून मोठ्या संख्येनं जेलभरो करण्यात येणार असल्याचे मच्छीमार नेत्यांकडून यावेळी सांगण्यात आलं.

close