नातलगांसाठी तिकीटं मागणार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी लावला चाप

January 27, 2012 12:23 PM0 commentsViews: 3

27 जानेवारी

नातलगांसाठी तिकीट मागणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच चाप लावला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या नातलगांसाठी अनेक नेत्यांनी पक्षाकडे तिकिटांची मागणी केली. पण त्याला मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेत हायकमांडकडे तक्रार केली. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांनी मुंबई महापालिकेतल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी एक संसदीय समितीची स्थापना केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये सर्व गटांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात मुरली देवरा, गुरुदास कामत, वर्षा गायकवाड, नसीम खान, नारायण राणे, सुरेश शेट्टी आदी नेत्यांचा समावेश आहे.

close