सोलापुरात विडी कामगारांच्या नोकर्‍या धोक्यात

November 21, 2008 5:35 AM0 commentsViews: 41

21 नोव्हेंबर, सोलापूरसिद्धार्थ गोदामजागतिक मंदीच्या लाटेत मोठमोठ्या उद्योगांनी कामगार कपातीचं हत्यार उपसलय. पण सोलापुरात धुम्रपान विरोधी कायद्याचा आधार घेऊन, विडी कारखाना मालकांनी 40 टक्के कामगार कपातीचा निर्णय घेतला. जवळपास 7 हजार विडी कामगारांना कारखाना व्यवस्थापनानं नोटिसाही बजावल्या आहेत. रहीमतबी मागील चाळीस वषांर्पासून विडी वळण्याचे काम करतात. पण धूम्रपान विरोधा कायद्याची पळवाट शोधत कारखाना मालकाने त्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस दिली. रहीमतबींसमोर आता प्रश्न निर्माण झाला तो आपल्या चार मुलांच्या पालनपोषणाचा.सोलापुरातल्या अनेक विडी कामगारांची अवस्थाही रहिमतबींसारखीच आहे. म्हणूनच कामगार कपातीच्या विरोधात आता विडी कामगारांनी आंदोलन छेडलय. धुम्रपान विरोधी कायद्याचा आधार घेत कारखाना मालक महिला विडी कामगारांवर अत्याचार करत असल्याचा आरोप होऊ लागलाय. दुसरीकडे आपल्या भूमिकेवर कारखाना मालक ठाम आहेत. 'धुम्रपानविरोधी कायद्यामुळे विड्यांची मागणी घटलीय. कारखाना सुरू ठेवायचा असेल, तर आम्हाला कामगार कपात करावीच लागेल' असं गोविंदप्रसाद तिवारी या विडीकारखानदाराचं म्हणणं आहे.विडी उद्योगावर 70 हजार कुटूंबांचं पोट आहे. कर्जबाजारीपणामुळं महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांसमोर जशी समस्या आहे, तशीच या विडी कामगारांसमोर आता उभी राहणार आहे. हे जर टाळायचं असेल तर लवकारात लवकर शासनानं पुढाकार घेऊन या प्रश्नावर तोडगा काढायला हवा.

close