‘अग्निपथ’ पडला ‘बॉडीगार्ड’वर भारी

January 27, 2012 12:58 PM0 commentsViews: 2

27 जानेवारी

'चिकनी चमेली' धमाकेदार गाणं, संजय दत्तची खलनायकाची भूमिका आणि अजय अतूलचं मराठमोळं संगीत त्याबरोबर ऋतिक रोशन आणि प्रियंका चोप्रा यांची दमादार परर्फामन्स या जोरावर गुरूवारी रिलीज झालेला बहुचर्चित सिनेमा अग्निपथनं एक नवा रेकॉर्ड केला आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमानं बॉडीगार्डचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एकूण 25 कोटींचे अग्निपथचे ओपनिंग कलेक्शन झाले असून सलमान खानच्या बॉडीगार्डनं पहिल्या दिवशी 21 कोटींची कमाई केली होती. अजूनही वीकेंड कलेक्शन बाकी आहे त्यामुळे बॉडीगार्डनं केलेले कमाईचे बाकी रेकॉर्डही अग्निपथ मोडणार का ? याकडे आता बॉक्स ऑफिस जाणकारांचं लक्ष आहे.

close