13/7 बॉम्बस्फोटातला आरोपी जात होता गवळीच्या जिममध्ये !

January 27, 2012 2:08 PM0 commentsViews: 2

27 जानेवारी

मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट करणार्‍या एका दहशतवाद्याने गँगस्टर अरुण गवळी याच्या भायखळ्यातल्या दगडी चाळीतल्या जीम मध्ये प्रवेश घेतल्याचे उघडकीला आलं आहे. झवेरी बाजार आणि ऑपेरा हॉऊस इथं दोन जणांनी स्फोट घडवले होते. यापैकी एका दहशतवाद्याने जीममध्ये प्रवेश घेतला होता, अशी माहिती एटीएसनं दिली. त्याच दहशतवाद्यानं अरुण गवळी याचा ट्रस्ट चालवत असलेल्या जिममध्येही प्रवेश घेतला होता. या जिममध्ये त्या दहशतवाद्याला कुणी प्रवेश मिळवून दिला याचा तपास आता एटीएसचे अधिकारी घेत आहे.

close