साखर नियंत्रणमुक्त करण्यासाठी समिती स्थापन

January 27, 2012 2:17 PM0 commentsViews: 5

27 जानेवारी

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी साखरेला नियंत्रणमुक्त करण्याच्या मागणीवर नेमकी काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे. ही समिती आता आपला अहवाल पंतप्रधानांना देईल.आज सकाळी पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये यासंदर्भात निर्णय घेतला. या समितीमध्ये कोण कोण तज्ज्ञ असतील त्यांची नावं अजून नक्की झालेली नाहीत. महाराष्ट्र राज्य साखर महासंघ सातत्याने साखर नियंत्रणमुक्त करावी अशी मागणी करतोय. या आधीही पंतप्रधानांनी याच मुद्यावर मंत्रीगटाची स्थापना केली होती. या मंत्रीगटात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, कृषीमंत्री शरद पवार आणि नागरी पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस यांचा समावेश होता. या गटात साखरेच्या निर्यातीवरून तीव्र मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यामुळे, अखेर आता पंतप्रधानांनी तज्ज्ञांची कमिटी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

close