कलमाडींचा पुणे दौरा बारगळला

January 27, 2012 9:46 AM0 commentsViews: 1

27 जानेवारीकॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणातील सुरेश कलमाडींचा आजचा पुणे दौरा बारगळला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज कलमाडी पुण्याला येणार होते. कोर्टाच्या कामकाजामुळे कलमाडींची पुणे भेट लांबणीवर पडली आहे असं सांगण्यात येतंय. बुधवारी झालेल्या बस अपघातातील जखमींना ते भेटणार होते. त्यातच महापालिकेच्या निवडणुकांसाठी अचूक टायमिंग साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कोर्टाचे कामकाज हे खरं कारण नसून, पक्षांतर्गत विरोधक आक्रमक झाले, कलमाडी या परिस्थितीत आले तर त्याचा निवडणुकीवर विपरित परिणाम होईल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातच कलामाडींचं स्वागत करायच की नाही अशी समर्थकांचीही चलबिचल सुरु होती. या संभ्रमावस्थेमुळेच कलमाडींची आजची पुणे भेट लांबणीवर पडली आहे. पण नंतर कलमाडी येणारच आहेच, कदाचित 1 तारखेनंतरही येऊ शकतील.

close