बस अपघातातील जखमींवर ससूनमध्ये उपचाराला अडथळे

January 27, 2012 3:21 PM0 commentsViews: 2

27 जानेवारी

पुण्यात बुधवारी माथेफिरु संतोष माने यांने बस पळवून हैदोस घातला यात 8 जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी झाले.जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण या जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये एक वर्षापासून सिटी स्कॅन मशिन बंद पडलं आहे. त्यामुळे पेशंट्सचे हाल होत आहे. आपात्कालीन स्थितीत ससून हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना केईम रूग्णालयात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे रूग्णाचे सिटी स्केन रिपोर्ट उशिरा मिळत आहे त्यामुळेरूग्णाना योग्य उपचार मिळण्यात बराच उशिर होतोय. ससून रूग्णालयचा प्रशाकीय विभाग रूग्णाच्या जिवाशी खेळ करत आहे. असा आरोप अपघातातील रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

close