कोल्हापूरच्या पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा

November 21, 2008 5:48 AM0 commentsViews: 119

21 नोव्हेंबर, कोल्हापूरहर्षल सुर्वेकोल्हापूरची पंचगंगा नदी दिवसेंदिवस प्रदुषित होत चाललीय.पण प्रशासन कोणतीच उपाय योजना करताना दिसत नाही. यावर आमचे सिटिझनन जर्नलिस्ट हर्षल सुर्वे यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट.नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नदी सर्वेक्षणामध्ये पंचगंगा नदीला सर्वात प्रदुषित नदी घोषित केलंय. या पंचगंगेच्या काठावर असणारे साखर कारखाने,महानगर पालिका,नगरपालिका यातील सर्व घटक या पंचगंगेच्या प्रदुषणाला जबाबदार आहेत. प्रामुख्यानं या ठिकाणी असणारे साखर कारखान्यांच्या मळीचं पाणी यामध्ये मिसळतं. महानगरपालिकेतील जवळजवळ बारा ठिकाणाहून पंचगंगेचं प्रदूषण होतं. प्रदूषणाबद्दल गेली पंचवीस वर्षे लढा देणार्‍या पर्यावरणवादी संघटना आहेत. पंचगंगा संवर्धन समिती आहे. अनेक निसर्गप्रेमी संघटना आंदोलन करतायत. यावर महापालीका आणि महाराष्ट्र शासन यांनी श्वेत पत्रिका तयार केली. श्वेत पत्रिका जरी जाहीर झाली, तरी पंचगंगेचं प्रदुषण कसं कमी होईल यावर शासन आणि प्रशासन गप्प आहे. यावर कोणतीचं तरतूद करण्यात आलेली नाही. या पंचगंगेच प्रदुषन थांबलं नाही तर कोल्हापूरची पवित्र असणारी पंचगंगा गटार गंगा व्हायला वेळ लागणार नाही.

close