भारताला जिंकण्याच्या चान्सच नाय;आता व्हाईटवॉशच !

January 27, 2012 10:01 AM0 commentsViews: 1

27 जानेवारी

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्येही भारताला व्हाईटवॉश मिळणार हे आता जवळ जवळ पक्कं झाला आहे. ऍडलेड टेस्टमध्येही भारतीय टीम पराभवाच्या वाटेवर आहे. ऑस्ट्रेलियन टीमने पाचशे रन्सचं आव्हान दिल्यावर भारतीय टीमने दुसर्‍या इनिंगमध्ये सहा विकेट गमावल्या आहेत. आणि स्कोअर आहे फक्त 166 रन्स. दुसर्‍या इनिंगमध्येही भारतीय बॅट्समन केविलवाणी दिसली. सेहवागने 62 रन केले. पण तो ही जीवावर उदार होऊन खेळत होता. बाकी गंभीर 3, द्रविड 25, सचिन 13 आणि लक्ष्मण 35 असे ठरावीक अंतराने बॅट्समन आऊट झाले. दिवसाचा शेवटच्या ओव्हरमध्ये विराट कोहलीही 22 रनवर रनआऊट झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या चारही टेस्टमध्ये गौतम गंभीरचा खराब फॉर्म कायम राहिला. ऍडलेड टेस्टच्या दुसर्‍या इनिंगमध्ये गंभीर केवळ 3 रन्स करुन आऊट झाला. वीरेंद्र सेहवागने धडाकेबाज बॅटिंग केली खरी पण टीमला गरज असताना तोही मैदानावर फार काळ उभा राहिला नाही. सेहवागने 53 बॉलमध्ये 12 फोर मारत 62 रन्स केले. राहुल द्रविडही झटपट आऊट झाला त्याने 25 रन्स केले. समाधानाची गोष्ट इतकीच की द्रविड क्लिन बोल्ड झाला नाही. हॅरिसच्या बॉलवर मायकेल हसीकडे कॅच देऊन तो आऊट झाला. 8 इनिंगमध्ये द्रविड तब्बल 6 वेळा क्लिन बोल्ड झाला आहे. सचिन तेंडुलकरचे महाशतक या सीरिजमध्येही होऊ शकलं नाही. गेले दहा महिने सचिनच्या महाशतकाची प्रतीक्षा क्रिकेटप्रेमीना लागलीय. ऍडलेड टेस्टमध्ये सचिन केवळ 13 रन्स करुन आऊट झाला.तर व्ही व्ही एस लक्ष्मणही या सीरिजमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या सीरिजमध्ये त्याचा हायेस्ट स्कोर आहे केवळ 66 रन्सचा…ऍडलेड टेस्टच्या दुसर्‍या इनिंगमध्ये लक्ष्मण 35 रन्स करुन आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी करत एकाकी लढत देणारा विराट कोहलीही दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय टीमच्या मदतीला येऊ शकला नाही. कोहली 22 रन्सवर रनआऊट झाला.

close