प्रक्षोभक वक्तव्य न दाखवण्याची आयोगाची मीडियाला सूचना

January 27, 2012 6:19 PM0 commentsViews: 4

27 जानेवारी

निवडणूक आयोगाविरोधात केलेली प्रक्षोभक वक्तव्यं दाखवू नका, अशी सूचना राज्य निवडणूक आयुक्तांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाला केली. आयुक्तांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संपादकांना आज एक पत्र पाठवलंय. राजकीय नेत्यांनी आयोगाविरोधात केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये किंवा चर्चेच्या कार्यक्रमात दाखवलं नाही, तर आम्ही स्वागत करू असं आयोगानं आपल्या पत्रात म्हटलं आहे. आयोगाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला अशा प्रकारचं सूचनावजा पत्र पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निवडणूक आयोगाचे जश्याच तसं पत्र

निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे, याकडे मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचं लक्ष वेधू इच्छितो. राज्य निवडणूक आयुक्त हेसुद्धा एक घटनात्मक पद आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाविरोधात केलेलं कोणतंही प्रक्षोभक वक्तव्य आपण आपल्या बातम्यांमध्ये दाखवलं नाही, किंवा ए़डिट करून दाखवलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर कुणाची हरकत असल्यास, ते योग्य त्या कोर्टात दाद मागू शकतात.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार.अविनाश सणस, सहआयुक्त, राज्य निवडणूक आयोग

close