ठराविक देशात आक्षेपार्ह मजूकर ट्विटर रोखणार

January 27, 2012 5:07 PM0 commentsViews: 7

27 जानेवारी

अखेर मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने यापुढे काही ठराविक देशांमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एखाद्या देशाच्या सरकारने विनंती केली तरच आक्षेपार्ह ट्विट्स काढण्यात यायचे.. पण आता एखाद्या देशामध्ये ज्या गोष्टींवर बंदी असेल त्यासंबंधीचे ट्विट्स त्या देशातल्या ट्विटर साईटवरुन आपोआप काढून टाकण्यात येईल. भारत सरकारनंही सोशल मीडियाला आक्षेपार्ह मजकूर काढण्याची सूचना केली होती. दिल्ली हायकोर्टानंही तसे आदेश दिले होते. पण सध्या तरी कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटनं ही सूचना अंमलात आणलेली नाही. भारतात ट्विटरने जर हे पाऊल उचलेलं तर हे पहिलंच ठरणार आहे.

close