‘मटा’च्या कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड

January 28, 2012 1:42 PM0 commentsViews: 3

28 जानेवारी

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयावर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हल्ला केला. वृत्तपत्राच्या प्रतींची जाळपोळ करून कार्यालयाची तोडफोडसुद्धा कार्यकर्त्यांनी केली. आजच्या महाराष्ट्र टाईम्सच्या अंकात खासदार आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीच्या वाटेवर अशा आशयाची बातमी छापून आली होती.

या बातमीन संतप्त होऊन अडसूळ यांच्या को -ऑपरेटीव्ही बँक एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकर्त्यांनी दुपारी सव्वा एकच्या सुमाराला म.टा.च्या कार्यालयाच्या प्रवेशद्वावावर वृत्तपत्रांच्या प्रती जाळल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून रिसेप्शन आणि वेटींग रूमची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. खरंतर कार्यकर्ते बातमीचा खुलासा द्यायला आले होते. पण खुलासा संपादकांकडे न देता त्यांनी तोडफोड सुरू केली. याप्रकरणी धुडघूस घालणा-या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली अशी माहिती मुंबईचे सहआयुक्त रजनीश शेठ यांनी दिली.

close