मालिका गेली, लाजही गेली

January 28, 2012 10:25 AM0 commentsViews: 1

28 जानेवारी

इंग्लंडपाठोपाठ भारताला ऑस्ट्रेलियात मान खाली घालून घरी परतावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने कसोटीची मालिका 4-0 ने जिंकली आहे. धोणी बिग्रेडच्या वाघांच्या लाजिरवान्या कामगिरीमुळे व्हाईटवॉश मिळत लाजही गेली आणि मालिकाही हातातून गेली. ऍडलेड टेस्टमध्ये भारत 298 रन्सनी पराभूत झाला. टेस्टच्या पाचव्या दिवशी भारताची टीम 201 रन्सवर ऑलआऊट झाली. परदेशात भारताचा हा सलग 8 वा पराभव आहे. कालच्या 166 रन्सवरून खेळताना भारताला आज फक्त 35 रन्स जोडता आले. आणि टीम सकाळच्या सत्रातच ऑल आऊट झाली. मॅचमध्ये लक्षवेधी कामगिरी करणार्‍या पीटर सिडल मॅन ऑफ द मॅच तर कॅप्टन मायकेल क्लार्कला मॅन ऑफ द सीरिज ठरले.या पराभवामुळे भारतीय टीमची आयसीसी क्रमवारीत घसरण झालीय.टेस्ट क्रमवारीत भारतीय टीम 3 स्थानावर घसरली आहे.

close