ऑस्टेलियन ओपनमध्ये पेस-व्हेस्निना जोडी पराभूत

January 29, 2012 1:00 PM0 commentsViews: 2

29 जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिक्स डबल्सच्या फायनलमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि रशियाच्या एलिना व्हेस्निना जोडीला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना मॅटेक संॅड आणि होरिया टेकाऊ जोडीने 3-6, 7-5, 3-10 असं पराभूत केलं आहे. पेस-व्हेस्निना जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. रंगतदार झालेल्या मॅचमध्ये दमदार खेळ करत संॅड टेकऊ जोडीने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. पण दुसर्‍या सेटमध्ये पेस-व्हेस्निना जोडीने मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. तिसर्‍या सेटमध्ये मात्र विरोधी टीमने कोणतीही संधी दिली नाही आणि यंदाच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

close