इंग्लंडविरुध्दच्या मालिकेत सचिनचा कमबॅक

November 21, 2008 5:56 AM0 commentsViews:

21 नोव्हेंबरइंग्लंडविरुध्दच्या पुढच्या दोन वन डे मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं टीममध्ये पुनरागमन झालंय. तब्बल 8 महिन्यानंतर सचिन वन डे खेळणार आहे. या टीममध्ये फारसे बदल न करता भारतीय टीमचं विनिंग कॉम्बिनेशन निवड समितीनं कायम ठेवलं आहे. युवराज सिंगच्या जबरदस्त फॉर्ममुळे इंग्लंड टीमनं भारतीय बॅटिंगचा जबरदस्त धसका घेतलाय. त्याचबरोबर आता सचिनचा वन डेमधील कमबॅक ही इंग्लंड टीमसाठी एक चिंतेची गोष्ट ठरणार आहे. असं असलं तरी आर. पी . सिंग आणि एम. विजय यांना टीममधून बाहेर ठेवण्यात आलंय. आर.पी सिंगच्या एवेजी इरफान पठाणला संधी देण्यात आलीय. इंग्लंडविरुद्धच्या सात वन डेच्या सीरिजमध्ये भारतानं आता 3 – 0 अशी आघाडी घेतली आहे.

close