अण्णांची प्रकृती अस्वस्थ ; उपचारांसाठी दिल्लीला जाणार

January 28, 2012 11:57 AM0 commentsViews: 3

28 जानेवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. अण्णांनी काहीदिवसांपुर्वीच पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता. अण्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना काही औषधांमुळे साईड-इफेक्ट्स झाल्यामुळे दिल्लीतील मेदांत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहेत. तसेच गरज भासल्यास पंचकर्म उपचारासाठी बँगलोरला हलवणार असल्याचे सांगण्यात येतं आहे.

सक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी प्रकृती ठीक नसताना मुंबईत 27 डिसेंबर 2011 रोजी दोन दिवसांचे उपोषण केले. उपोषणादरम्यान अण्णांची प्रकृती खालावल्यामुळे उपोषण सोडावे लागले. अण्णांनी एकदिवस मुंबईत उपचार घेतल्यानंतर राळेगणला रवाना झाले होते.पण प्रकती काही सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टर संचेती यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच सल्ला दिला. अण्णांनी आठवडाभर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. दरम्यानच्या काळात अण्णांनी सर्व आंदोलन मागे घेतली तसेच पाच राज्यातील निवडणुकात प्रचार करणार नाही असंही जाहीर केलं. वेळोवेळी सुरु असलेल्या औषधामुळे अचानक अण्णांना काही गोळ्याचा साईट इफेक्टसचा त्रास सुरु झाला यामुळे अण्णांना दिल्ली येथील गुडगाव येथील मेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करणार आहे.

close