वाल्याचा वाल्मिकी झाला तर गैर काय ?-अजितदादा

January 29, 2012 10:30 AM0 commentsViews: 5

29 जानेवारी

आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवारांनी साम दाम दंड भेद अशा सगळ्या अस्त्रांचा पुरेपूर वापर केलाय. सोलापुरात गुंड रवी पाटीलला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर आता अजित पवारांनी चक्क वीज चोरीचा आरोपी आणि तडीपारीचा प्रस्ताव असलेल्या शिरुर तालुक्यातल्या मंगलदास बांदल यांना पुण्यातल्या जिजाऊ बंगल्यावर रात्री 11.30 वाजता अंधरातच पक्षात प्रवेश दिला. बांदल यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत वाल्याचा वाल्मिकी झालाय तर त्याला पक्षात घेण्यात काय गैर असा सवालही अजित पवारांनी विचारला आणि विशेष म्हणजे बांदल यांना जिल्हा परिषदेच्या शिक्रापूर गटातून पक्षाने उमेदवारीही दिली आहे.

close