ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविच चॅम्पियन

January 29, 2012 4:56 PM0 commentsViews: 4

29 जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष गटात नंबर वन सिडेड नोवाक जोकोविच चॅम्पियन ठरला आहे. फायनलमध्ये त्याने स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला आहेत. जबददस्त चुरशीच्या झालेल्या या मॅचमध्ये पहिला सेट 7-5 असा जिंकत नदालने दमदार सुरुवात केली आहे. पण जोकोविचने पुढचे दोन्ही सेट 6-4 आणि 6-2 असे सहज जिंकत मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. चौथा सेट मात्र कमालीचा रंगतदार ठरला. ट्रायब्रेकपर्यंत रंगलेल्या हा सेट 7-6 असा जिंकत बरोबरी साधली. पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्येही नदालने आघाडी घेतली. पण जोकोविचनं आक्रमक खेळ करत हा सेट 7-5 असा जिंकला आणि मॅचही खिशात घातली. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचं सलग दुसर्‍यांदा जेतेपद पटकावलं तर करियरमधीलं हे त्याचं पाचवं ग्रँडस्लॅम ठरलं आहे.

close