महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसची महाआघाडी

January 29, 2012 4:15 PM0 commentsViews: 13

29 जानेवारी

महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनी रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहेत. आधी जोगेंद्र कवाडे आणि आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काँग्रेसने आघाडी केली आहे. काँग्रेस आणि भारिपबहुजन महासंघाची ही आघाडी काही जिल्हा परिषदापुरती असणार आहे. तशी घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर आणि माणिकराव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत केली. एकूणच काय तर या सत्तेच्या सारीपाटात सगळ्याच राजकीय पक्षांनी हवी आहेत ती दलित मतं. ती मिळण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. शिवसेना भाजपने रामदास आठवलेंना सोबत घेऊन महायुतीचा प्रयोग केला आहेत. काँग्रेसला जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर यांनी हात दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने गवई गटाला आपलंसं केलं आहे. एकूणच काय तर सर्वच राजकीय पक्षांनी आज निळा झेंडा खांद्यावर घेतला आहे.

close