इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांच्यावर बंदीचा पुनर्विचार

January 29, 2012 5:04 PM0 commentsViews: 2

29 जानेवारी

अँट्रिक्स – देवास डील प्रकरणी इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांच्यावर घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्यात येईल असे संकेत पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी आयबीएन नेटवर्कला याबद्दल माहिती दिलीय. प्रत्युष सिन्हा यांनी दिलेल्या अहवालानुसार सरकारने कारवाई केली होती. पण अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी सरकारच्या या कारवाईला विरोध केला होता.

close