नागपुरात बस स्टॉप्सची अवस्था बिकट

November 21, 2008 10:04 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर, नागपूरप्रशांत कोरटकरनजर तुमच्या शहरावर या आयबीएन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात यंदा नागपूरचा वेध घेण्यात येणार आहे. त्यामिनित्तानं नागपूरच्या विविध समस्या आयबीएन लोकमतवर मांडण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नागपूरमधल्या बस स्टॉप्सच्या समस्या आयबीएन लोकमतनं मांडल्या. नागपूर शहरातील सामान्य नागरिकांच्या शहर प्रवासासाठी महापालिकेनं काही दिवसापूर्वीच स्टार बसेस सुरू केल्या. त्या आधी ठिकठिकाणी लाखोंचा खर्च करून बस स्टॉप्स तयार केले. पण या बस स्टॉप्सचा वापरच होत नसल्याने, त्यावर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याचंच चित्र आहे. नागपूरच्या वर्धमाननगर मध्ये रहाणारे अरुण शेष कामा निमित्तांन महापालिकेच्या सिटी बसनं रोजच श्रध्दानंद पेठेत येतात . त्यांच्या घरापासून जवळच महापालिकेन बस स्टॉप तयार केला होता. पण आज याची अवस्था अतिशय बिकट आहे. नागपुरातल्या इतर नागरिकांची परिस्थितीही अरुण शेष यांच्यासारखीच आहे.जिथं स्टॉप आहे तीथ बस थांबत नाही आणि जिथ बस थांबते तिथ लोकांना बसायला जागा नाही. शहरात आयआरडीपीच्या माध्यमातून रस्ते रुदीकरणाचे काम झाले.2002 मध्ये नगरसेवक फंडातून शहरभरात 200 सिटी बसेससाठी लाखो रूपये खर्चून बस स्टॉप्स बांधले. नेत्यांनी थाटात उद्घाटनंही केली. बीओटी तत्वावरच्या बसस्टॉप्सच्या माध्यमातून महापालिका जाहिरातीतून पैसा कमावणार होती. पण बसस्टॉपच धड नाहीत, तर जाहिराती देणार तरी कोण ? आता पुन्हा महापालिका नव्यान बसस्टॉप तयार करण्याचा घाट घालतेय.पालिकेत सध्या विरोधात असलेले राजकारणी उद्या हीच धोरणं पुढे राबवणार आहेत. पण राजकारणात भरडला जातो तो सामान्य माणूस !

close