सत्ता आली तर बलात्कार पीडितांना नोकरी देऊ – मुलायम सिंग

January 29, 2012 5:19 PM0 commentsViews: 7

29 जानेवारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय प्रचाराला रंग चढतोय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी आज एक विचित्र घोषणा करुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे. समाजवादी पक्ष सत्तेत आला तर बलात्कार पीडितांना नोकरी देण्याचे आश्वासन मुलायम सिंग यांनी दिले आहे. तसेच बलात्कार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. याशिवाय जर आमचे सरकार आले तर आमच्या पक्षाच्या वतीने गरजू महिलांना दोन साड्या आणि एक चादर मोफत दिली जाईल अशी घोषणाही मुलायम यांनी केली.

close