पुण्यात महायुती तोडण्याचा रिपाइंचा इशारा

January 29, 2012 12:03 PM0 commentsViews: 6

29 जानेवारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीत पुन्हा वाद उफाळून आला आहे. येत्या दोन दिवसात जर भाजपने आम्हाला हव्या असलेल्या जागा दिल्या नाही तर पुण्यात महायुती तुटेल असा इशारा आरपीआयने दिला आहे. पुण्यात शिवसेना आणि भाजपचे जागावाटप झालं आहे. भाजपला 89 जागा तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या आहेत. जागावाटपाच्या फॉर्म्यूलानुसार शिवसेना आणि भाजपने आपआपल्या कोट्यातल्या जवळपास 18 ते 20 जागा देणं आरपीआयला अपेक्षित आहे.

त्यातल्या शिवसेनेकडून 7 जागा आरपीआयला देण्यात आल्या आहेत. शिवसेनेनं दिलेल्या जागांवर आरपीआय समाधानी आहेत. तर शिवसेनेसोबत आणखी दोन जागांबाबत चर्चा सुरू असल्याचे आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी म्हटलं आहे. पण भाजपने दिलेल्या जागांवर आरपीआय समाधानी नाही. आरपीआयला हव्या असलेल्या जागा भाजपने दिल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता परत पुण्यात महायुती तुटण्याचं चिन्ह निर्माण झाली आहेत. दरम्यान, आरपीआयच्या मागणीनुसारच आम्ही त्यांना जागा दिल्या असल्याचा दावा विकास मठकरी यांनी केला. तसेच आरपीआयचे माध्यमांसोबत युतीबाबत चर्चा करणं चुकीचं असल्याचं मठकरी यांनी म्हटलं आहे.

close