मनसे नाराज उमेदवार ‘कृष्णकुंज’वर जमा

January 30, 2012 9:29 AM0 commentsViews: 5

30 जानेवारी

रविवारी मनसेची पहिली यादी जाहीर झाली आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे मनसेसैनिक रस्त्यावर उतरले. आज अनेक इच्छुक उमेदवारांनी 'कृष्णकुंज'वर गर्दी केली. यावेळी नाराजांची आता समजूत काढली जात आहे. काल मुंबईत प्रविण दरेकर, नितीन सरदेसाई यांच्या विरोधात नाराजांनी निदर्शनं सुद्धा केली. या नाराजांच्या नाराजीची दखल घेतली जाईल पण उमेदवार बदलला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळेच पक्षातल्या नाराजांची राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे भेट घेत आहे. आणि त्यांच्या नाराजीची कारणं ऐकून घेत आहेत. आज कृष्णकुंजवर अनेक नाराजांनी आपली नाराजी प्रकट करण्यासाठी गर्दी केली. आज दुपारी राज ठाकरे मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर करणार आहेत.

close