मराठी शाळांना परवानगीसाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर

January 30, 2012 9:49 AM0 commentsViews: 2

30 जानेवारी

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच बृहत आराखडा तयार झाला की लगेच मराठी शाळांना परवानगी देऊ अशी घोषणा शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केली. पण आता शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी शहरातल्या मराठी शाळांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा पुण्यातल्या जवळपास 6 शाळांमधली मुलं रस्त्यावर उतरुन आंदोलन करात आहे. आपल्या शाळेला परवानगी देण्याची मागणी ही मुलं करत आहे.

वर्षभरापुर्वी राज्यात परवानगी शिवाय ज्या मराठी शाळा सुरु आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा फतवा राज्य शासनाने काढला होता. आणि मग शाळा बंद झाल्यामुळे दुसर्‍या शाळांमध्ये जाण्याची पाळी या मुलांवर आली होती. ग्रामीण भागासाठीचा बृहत आराखडा तयार करण्यात आला. पण शहरी भागासाठी खास अभ्यासाची गरज आहे असं म्हणत शहरी भागातल्या शाळांवर अजुनही टांगती तलवार ठेवली गेली आहे. शैक्षणीक वर्ष संपत आलंय, तरीही ही प्रक्रीया पूर्ण व्हायला तयार नाही. त्यामुळेच आज पुण्यातल्या या मुलांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं.

close