राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

January 30, 2012 10:54 AM0 commentsViews: 1

30 जानेवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने काल रात्री उशिरा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेल्या 51 उमेदवारांमध्ये विद्यमान 14 पैकी 4 नगरसेवकांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे. तसेच सचिन अहिर यांचा भाऊ सुनिल, माजी मंत्री नवाब मलिक यांचा भाऊ आणि बहिणीला उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत 33 मराठी उमेदवार, 10 मुस्लीम, 3 उत्तर भारतीय आणि 2 गुजराती उमेदवारांचा समावेश आहे. अजूनही 7 जागांचा तिढा कायम असल्याने या जागांची घोषणा करण्यात आलेली नाही.

close