शिवसेनेतही बंडखोरीची लागण

January 31, 2012 8:57 AM0 commentsViews: 3

31 जानेवारी

शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेच्या 60 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज गुपचूप दाखल केले आहे. तर नगरसेवक आणि विधी विभागाचे अध्यक्ष राजा चौगुले यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सई शिर्के यांच्या विरोधात त्यांनी वॉर्ड क्रमांक 122- भटवाडी बर्वेनगरसाठी हा फॉर्म भरला.

तर दुसरीकडे बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने काही प्रमुख उमेदवारांना ए.बी फॉर्मचं वाटप केलं आहे. मुंबईतल्या विभागप्रमुखांमार्फत हे फॉर्म संबिधित उमेदवारांना देण्यात आल्याचं कळतंय आत्तापर्यंत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेल्यांमध्ये माजी महापौर शुभा राऊळ ,सभागृह नेते सुनिल प्रभु, राजुल पटेल ,यशोधर फणसे ,बाळा नर ,विष्णू कोरगांवकर ,यशवंत जाधव ,नाना आंबोले ,तृष्णा विश्वासराव आणि तावजी गोरूले या अनुभवी नगरसेवकांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज महापौर श्रध्दा जाधव , स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यासह उर्वरित 75 उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळतेय. यावेळी पहिल्यादांच शिवसेनेने बंडखोरीच्या धसक्याने शेवटच्या दिवसापर्यंत यादी जाहीर केली नाही.

close