डॉ. संचेती यांच्या उपचारासंदर्भात शंका घेऊ नये – अण्णा

January 31, 2012 9:27 AM0 commentsViews: 3

31 जानेवारी

डॉ. संचेती यांना मी गेल्या 25 वर्षांपासून ओळखतोय. त्यांच्यावर काहीही आरोप करणं चुकीचे आहे अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी डॉ. संचेती यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळुन लावले. अण्णांना उपचारानंतर औषधांचा साईट-इफेक्टचा त्रास सुरु झाला होता त्यासाठी त्यांनी उपचारासाठी दिल्लीत मेदांत हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहे.

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉ.संचेती यांच्या पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आठवडाभर उपचार घेतला. हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यानंतर अण्णा राळेगणला दाखल झाले. पण काही दिवसांनी अण्णांना गोळ्याचा साईड इफेक्टचा त्रास सुरु झाला. त्यामुळे उपचारासाठी दिल्लीत मेदांत हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहे. आज अण्णांनी एक प्रसिध्दीपत्रक काढून डॉ.संचेती यांच्या उपचारासंदर्भात कौतुकही केले. डॉ. संचेती यांना मी गेल्या 25 वर्षांपासून ओळखतोय. त्यांच्यावर काहीही आरोप करणं चुकीचे आहे असं अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच संचेती यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मविभूषण देण्यात आलं आहे. ते माझ्यावर उपचार करतात म्हणून नाही, असंही अण्णांनी स्पष्ट केले. तर डॉ.संचेती यांच्या उपचारांबद्दल काहीही शंका घेणं चुकीचं आहे असं टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. माझ्या विनंतीवरूनच डॉ. संचेती अण्णांवर उपचार करण्यासाठी राळेगणला गेले होते. त्यांनी केलेल्या उपचारांबद्दल कोणतीही शंका घेऊन नये असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

close