राणेंना झटका ; शंकर कांबळी राष्ट्रवादीत

January 30, 2012 4:01 PM0 commentsViews: 11

30 जानेवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला आज आणखी एक धक्का दिला. शनिवारी काँग्रेसचे माजी खासदार शिवाजीराव मानेंना पक्षात घेतल्यानंतर आज राष्ट्रवादीने कोकणात काँग्रेसला धक्का दिला. नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि वेंगुर्ल्याचे माजी आमदार शंकर कांबळी हे आज राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे नारायण राणेंना मोठा धक्का बसला आहे. शंकर कांबळी हे शिवसेनेतून नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले होते. पण काँग्रेसमध्ये आपल्याला योग्य सन्मान मिळाला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करू असा इशारा राणेंनी प्रहार या वर्तमान पत्रातल्या जाहिरातीतून दिला होता. त्यावर राष्ट्रवादीने असं उत्तर दिलं आहे.

नारायण राणेंनी आपल्या वर्तमानपत्रातून राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करण्याची वल्गना केली. पण राणेंचंच वस्त्रहरण करण्याचा चंग बांधलेल्या राष्ट्रवादीने त्यांना आज एक जोर का झटका दिला. नारायण राणेंचे सहकारी आणि वेंगुर्ल्यांचे माजी आमदार शंकर कांबळी यांना आपल्याकडे आणण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. शंकर कांबळी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नारायण राणेंसाठी हा मोठा धक्का आहे. शंकर कांबळी हे शिवसेनेतून नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले होते. पण काँग्रेसमध्ये आपल्याला योग्य सन्मान मिळाला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

close