राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच शहरप्रमुखांच्या फोटोला काळं फासलं

January 31, 2012 1:19 PM0 commentsViews: 3

30 जानेवारी

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भारिप बहुजन महासंघ आणि राष्ट्रवादीच्यावतीने अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली नाहीत. पण भारिपचे शहराध्यक्ष धैर्यवर्धन कुंडकर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप कुंडकर यांनी आपल्या मर्जीतील उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. शहरात भारिप आणि राष्ट्रवादीची आघाडी नसली, तरी या दोघा भावांनी अकोला महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद कमी करुन भारिपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न चालवलाय असा आरोप राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या शहराध्यक्षांनी करत, अकोल्यातल्या राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयातल्या प्रमुखांच्या फोटोला काळं फासलं.

close