वर्ल्डकपनंतर सचिनने निवृत्त व्हायला हवे होते -इम्रान खान

January 30, 2012 4:21 PM0 commentsViews: 2

30 जानेवारी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातल्या दारुण पराभवानंतर भारतीय टीममधल्यी सीनिअर खेळाडूंवर जोरदार टीका होऊ लागली आहे. राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मणच्या तर निवृत्तीचीही चर्चा रंगली आहे.पण याला अपवाद ठरलाय सचिन तेंडुलकर… सचिनच्या निवृत्तीबद्दल फारशी चर्चा होत नाही. करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती त्याच्या महाशतकाची… पण पाकिस्तानचे माजी क्रिकेट इम्रान खान यांनी थेट सचिनच्या निवृत्तीबद्दल मत मांडलं आहे. वर्ल्ड कप विजयानंतरच सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हायला हवं होतं आणि हिच योग्य वेळ होती असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. या अगोदर पाकच्या अन्य खेळाडूनी सचिन बेकामी आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. रावळपिंडी एक्सप्रेस शोयब अख्तरने तर मी बॉलिंग टाकत असताना सचिन मला घाबरायचा असा बिनकामी दावा केला होता. त्याने आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला होता मात्र आत्मचरित्राचा खप वाढवण्यासाठी शोयबाचा हा खटाटोप होती अशी टीका झाली होती. आता इम्रान खानने सचिनबद्दल केलं मत कोणत्या वळवणावर येऊन थांबणार हे लवकरच कळेल.

close