पुण्यात लष्करी अधिकार्‍यांच्या घरावर सीबीआयचे छापे

January 31, 2012 1:25 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी

पुण्यामध्ये सीबीआय आणि ऍन्टीकरप्शन ब्युरोने एकत्रपणे 2 माजी लष्करी अधिकार्‍यांच्या घरांसह कल्पतरू बिल्डरच्या ऑफिसवरही छापा घालण्यात आला आहे. सदर्न कमांडचे माजी प्रमुख लेफ्टनंट थंबुराज आणि सैन्यदलातील माजी अधिकारी एस. आर. नायर यांच्या घरी छापे हे घालण्यात आले आहे. लष्कराच्या तक्रारीनंतर हे छापे घालण्यात आल्याचं समजतंय. लष्कराची सुमारे एक एकर जमीन कल्पतरु बिल्डर्सना भाड्‌याने देण्यात आली होती. पण हा व्यवहार, नियम धाब्यावर ठेऊन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या व्यवहारात लष्कराला 40 कोटींचे नुकसान झालं आहे.

close