शाहरुखने लगावली फराह खानच्या नवर्‍याला थप्पड

January 30, 2012 4:49 PM0 commentsViews: 13

30 जानेवारी

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने फराह खानच्या नवर्‍याला थप्पड लगावली. हा कुठल्या सिनेमातला सीन नाही. तर अग्निपथला मिळेलेल्या घवघवीत यशामुळे एका सक्सेस पार्टीतली ही घटना आहे. फराह खानचा पती शिरिष कुंदर आणि शाहरूख खान यांच्यात बाचाबाची झाली. आणि रागाच्या भरात किंग खानने शिरीष कुंदरला थोबाडीत मारली. यावेळी संजय दत्तमध्ये पडला आणि त्यानंही शिरीष कुंदरला एक लगावली. शिरीष कुंदर हा संजय दत्तच्या पत्नी मान्यताला आक्षेपार्ह मेसेज पाठवत होता. त्यामुळे संजय दत्तही रागावल्याचं समजतंय. त्याआधी शाहरूखलाही तो सारखा फॉलो करत होता, म्हणूनच शाहरूखने थोपडीत ठेवून दिली. अस कळत आहे.

याप्रकरणावर फराह खानने ट्विटर आपली प्रतिक्रिया दिली.'शाहरूख खान नेहमी म्हणायचा कोणाला शारीरिक इजा करून प्रॉब्लेम सुटत नाही. मग असं कुणी केलं तर त्याला नक्कीच वैयक्तिक किंवा व्यावसायिक प्रॉब्लेम आहे. शाहरूखनं हे केलं याचं मला वाईट वाटतंय.'

close