13/7 बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक

January 31, 2012 3:33 PM0 commentsViews: 1

31 जानेवारी

मुंबईत 13 जुलै 2011 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी थेट दुबईतून पैसा पुरवला गेल्याचे तपासातून पुढे येत आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी आज आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. वजिचंद पथरिया असं त्याचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादचा रहिवासी आहे. वजिचंद हा हवाला ऑपरेटर असल्याची माहिती मिळालीय. त्याच्या चौकशीतून ही माहिती पुढे येतेय. त्याने या बॉम्बस्फोटांसाठी 10 लाख रुपये पुरवायला मदत केल्याचे समजतंय. त्याला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वजिचंदच्या अटकेमुळे 13 जुलैच्या बॉम्बस्फोटात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे. यापूर्वी नकी अहमद, नदिम अख्तर आणि हारुन रशीद या तिघांना अटक करण्यात आली होती.

close