राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षांनी स्त्रीभ्रूणहत्या मोहिमेला हरताळ फासला

January 31, 2012 2:16 PM0 commentsViews: 19

31 जानेवारी

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी 'जागर जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा' हे अभियान सुरु केलं आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच डॉक्टर सेलच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षांनी या मोहिमेला हरताळ फासला. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष डॉ. सदानंद इंगळे यांनी स्वत:च्या सोनोग्राफी सेंटरमध्ये तब्बल 20 केसेसमध्ये प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान केल्याच्या तक्रारी संबंधित पथकाकडे आल्या होत्या.

या तक्रारींची चौकशी केल्यानंतर, त्यामध्ये तथ्य आढळून आलं.आणि पथकाने डॉ. इंगळे यांच्या सोनोग्राफी सेंटरला सील ठोकलं आहे. पीसीएपीएनडीटी ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणानंतर एनसीपी डॉक्टर सेलच्या राज्याच्या अध्यक्षांनी डॉ. इंगळे यांना एनसीपी डॉक्टर सेलमधून निलंबित केल्याचा दावा केला आहे. पण डॉ. इंगळे यांनीच आयबीएन लोकमतला स्वत: एनसीपीडॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगितले आहेत.

close