पंजाब 80 टक्के तर उत्तराखंडमध्ये 70 टक्के मतदान

January 30, 2012 5:37 PM0 commentsViews:

30 जानेवारी

पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आज विधानसभेसाठीचं मतदान झालं. पंजाबमध्ये जवळपास 80 टक्के मतदान झालं. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झालं.लुधियानामध्ये भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसावर हल्ला करण्यात आला. तर भटिंडामध्ये डेरा सच्चा सौदाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. विधानसभेच्या 117 जागांसाठी 1,078 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही आज मतदान झालं. तिथं 70 टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तराखंडमध्ये सध्या चांगलीच थंडी आहे. त्यामुळे सकाळी मतदान अतिशय संथ गतीनं सुरु होतं. पण दुपारनंतर मतदानाला चांगला वेग आला. माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल यांनी सर्वात आधी मतदान केलं. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत.

close