कोल्हापूरमध्ये काँग्रेस विरुध्द काँग्रेस लढत निर्माण

January 31, 2012 2:45 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांना दम देऊनही कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातंर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि खासदार जयवंत आवळे यांच्यामध्ये जिल्हा परीषदेसाठी आपल्या समर्थक उमेदवाराला उमेदवारी मिळवून देण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. दोन्हीही नेत्यांमध्ये हुपरी, पट्टणकोडोली आणि रेंदाळ या तीन जिल्हापरिषद मतदारसंघातील उमेदवारंाच्या निवडीवरुन वाद निर्माण झाला आहे. दोन्हीही नेत्यांनी या तिनही मतदार संघात आपापल्या गटांचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत निर्माण झाली आहे. 28 तारखेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कोल्हापूर जिल्ह्यात प्रचार शुभारंभ झाला होता. त्यामध्ये नेत्यांनी पक्षापेक्षा स्वताला मोठं समजू नये असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

close