राणेंचा अजितदादांना ‘वस्त्रहरण’चा इशारा

January 31, 2012 4:14 PM0 commentsViews: 6

31 जानेवारी

पोकळ धमक्या कोणाला देतात, तुमच्या धमक्याना राणे घाबरत नाही, माझ्याविरोधात टीका करणे थांबवले नाही तर तुमच्या जिल्ह्यात येऊन तुमचेचं वस्त्रहरण करेन, असा इशारा राणेंनी अजित पवार आणि आर.आर.पाटील यांना दिला. तुमच्याच जिल्ह्यात येऊन तुमचीच पोलखोल करेल असा दमही राणेंनी भरला. राणेंची वस्त्रहरण सभा मोठ्या गर्दीत पार पडली पण आघाडीतील नेत्यांची आप-आपसातील लढाई समोर आली.

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची काही दिवसांपासून चर्चेत आलेली 'वस्त्रहरण' सभा कुडाळमध्ये मोठ्या गर्दीत पार पडली यावेळी राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तोफ डागली. वेंगुर्ल्यातली दंगल राष्ट्रवादी काँग्रेसनंच घडवली असा थेट आरोप नारायण राणेंनी केला. बाटल्या दगड हेच लोक फेकत होती कारस्थान यांचेच होते आणि यात माणसं मुंबईची वापरली त्यात पोलिसांना फोन लावणारी माणसही यांचीच होती आर.आर.पाटील यांचे नाव घेत राणेंनी टीका केली. राज्यात कोणतीही घटना घडो, आर आर पाटलांचं ठरलेलं एकच विधान असतं. तसंच कोकणापेक्षा पुण्यात जास्त भीतीचं वातावरण आहे असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. कोकणाला निधी देताना आकस दाखवला जातो असा आरोप करत पक्ष सोडून गेलेल्यांची पर्वा करत नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

close