नागपुरात इमारतीच्या ढिगाराखाली आणखी मृतदेहाची शक्यता

February 1, 2012 1:37 PM0 commentsViews: 1

01 जानेवारी

नागपूरच्या कळमना परिसरात कोसळलेल्या खंडेलवाल कोल्ड स्टोरेजच्या इमारतीचा मलबा हटवण्याच काम सुरु आहे. आज या मलब्याखाली एक मृतदेह काढण्यात आला. सोमवारी ही इमारत कोसळली होती. दोन दिवसानंतरही प्रशासन ढिगारा दूर करण्यात यश आलेलं नाही. या मलब्याखाली अजून काही जण दबले असल्याची शक्यता आहे. या आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. जवळपास फायर ब्रिगेड, पोलिस दलाचे 150 जवान मलबा काढण्यासाठी कार्यरत आहेत. या घटनेतील 13 जखमींना उपचारासाठी मेवो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे छत्तीसगडी मजूर होते.

close