अजित सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई

February 1, 2012 9:30 AM0 commentsViews: 2

01 फेब्रुवारी

काँग्रेसमध्ये राहून काँग्रेस नेत्यांच्या विरोधात बोलल्याबद्दल अजित सावंत यांना निलंबित केल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं माणिकराव ठाकरे बोलत होते. काँग्रेसमध्ये आर्थिक सौदेबाजी करून उमेदवारी दिल्याचा आरोप काल अजित सावंतांनी केला होता. त्यानंतर आपल्यावर कारवाई होईल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज माणिकराव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.मात्र काँग्रेस पक्षातून निलंबित झाल्याची नोटीस आपल्याला अजून आली नाही पण असं असेल तर चोर सोडून संन्याशाला बळी दिलं जात असल्याची भावना अजित सावंत यांनी बोलून दाखवली. सावंत यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केला असा गंभीर आरोप आमच्याआजच्या सवाल या कार्यक्रमात केला होता. दरम्यान, काही दिवसांपुर्वी सावंत यांनी कृपाशंकर सिंग यांच्या विरोधातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती.

close