ऑटोमोबाईल लोनचे नियम आणखी कडक

November 21, 2008 10:48 AM0 commentsViews: 45

21 नोव्हेंबर, मुंबईनमिता सिंगसध्या बाजारात अनेक नवीन-नवीन गाड्या येत आहेत. सहाजिकच ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण तरीही त्या खरेदी करणं तितकसं सोप राहिलेलं नाही. आता कार लोन किंवा टू व्हीलर लोन घेणं अजून कठीण झालंय, कारण डिफॉल्टरर्सची संख्या वाढल्यामुळे बॅकांनी लोन देण्याचे नियम कडक केले आहेत. 'अगोदर बॅका घर आणि नोकरी बघून लोन देत,जर तुम्ही भाड्याने राहत असलात तरी लोन मिळायचं. पण आता स्वत:चं घर,फोन,चांगली नाकरी असेल तरच लोन मिळतं' असं फजलभॉय मोटर्सचे मालक आरिफ फजलभॉय यांनी सांगितलं. बँका 50 ते 60 अर्ज नामंजूर करत असल्याचं कार डीलर्सचं म्हणणं आहे. याआधी बाईकच्या एकूण किंमतीच्या 80 ते 90 टक्क्यांपर्यंत लोन द्यायच्या. पण आता फक्त 60 ते 75 टक्के लोन मिळतं. त्यातही मंदीचा फटका ज्या सेक्टर्सना बसलाय त्या आयटी, बीपीओ आणि एव्हिएशन सेक्टरमधल्या लोकांना कर्ज मिळणं जास्त कठीण झालं आहे.चोविस तासात कर्ज देण्याचा दावा करणार्‍या बँका आता यासाठी 10 ते 12 दिवस घेत आहेत. इतकंच नाही जर तुम्हाला जुनं मॉडेल असलेली कार आवडली, तर कर्ज मिळणं अजिबात शक्य नाही कारण सेकंड हँड गाड्यांना कर्ज देणं जवळपास सगळ्याच बँकांनी बंद केलं आहे.

close