तरूणीवर अ ॅसिड फेकणार्‍या तरुणाला अटक

February 1, 2012 10:12 AM0 commentsViews: 3

01 फेब्रुवारी

गोरेगाव रेल्वे स्टेशनवर काल एका तरूणीवर ऍसिड फेकल्याप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिसांनी पिंटू शेख या व्यक्तीला अटक केली आहे. आरती ठाकूर ही तरूणी काल गोरेगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी होती. त्यावेळेस पिंटूनं तिच्या अंगावर ऍसिड फेकलं. हे दोघंही बोरीवलीच्या मकवानी भागांतील रहिवासी आहेत. वैयक्तिक वादातून पिंटूने हा हल्ला केल्याचं समजतं. दरम्यान नालासोपार भागातून पिंटुला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला आहे. पिंटूला आज बोरीवली कोर्टात हजर केलं जाणार आहे. आरतीवर युवतीवर गोरेगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

close