विकासाचा दावा करत मायावतींनी फोडला प्रचाराचा नारळ

February 1, 2012 5:20 PM0 commentsViews: 4

01 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. सीतापूरमध्ये त्यांनी पहिली प्रचार सभा घेतली. या पहिल्याच प्रचार सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यानंतर कुठल्याही सरकारने केला नाही एवढा विकास आपण केला, असा दावा मायावतींनी केला. राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. फक्त बहुजन नाही तर सर्वजनांचा विकास करायचा असं म्हणत त्यांनी दलित तर समाजातल्या लोकांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

close