ममतांची दीदी’गिरी'; कर्मचार्‍यांच्या संपावर बंदीच्या विचारात

February 1, 2012 5:29 PM0 commentsViews: 3

01 फेब्रुवारी

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संप करण्याच्या हक्कावर बंदी आणण्याचा विचार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करत आहे. सर्विस रुलमधल्या कलमानुसार राज्य सरकारी कर्मचार्‍यांना संघटना स्थापन करण्याचा आणि संपावर जाण्याचा अधिकार आहे. पण हे कलमच सर्व्हिस रूलमधून रद्द करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा विचार आहे. कामगार संघटनांमध्ये शिस्त निर्माण करणे आणि राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येतंय असा दावा राज्य सरकारने केला आहे. ममता बॅनर्जी सरकारचं हे पाऊल अयोग्य आणि अन्यायकारक आहे, असा आरोप काँग्रेसने केला. तर असा निर्णय घटनाविरोधी असल्याचे डाव्यांनी म्हटलं आहे. कामगार संघटनांनीही त्याला तीव्र विरोध केला आहे.

close