आघाडीच्या जाहीरनाम्यात कळीचा मुद्दा मराठीचा !

February 1, 2012 5:53 PM0 commentsViews: 31

आशिष जाधव, मुंबई

01 फेब्रुवारी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी आघाडी कुठल्या मुद्द्यांवर भर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. पण या जाहीरनाम्यातला कळीचा मुद्दा असणार तो म्हणजे मराठी मतदारांना आघाडीने दिलेली आश्‍वासनं..

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. त्यामुळेच, कधी नव्हे ते विकासाच्या मुद्द्यावर सेना भाजप युतीला मुंबईमध्ये लक्ष करण्याचा आघाडीचा इरादा आहे. साहजिकच, सामान्य मुंबईकरांना डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आपला खास जाहीरनामा प्रसिद्ध करतेय.

आघाडीचा जाहीरनामा

- मुंबई कचरा आणि खड्डेमुक्त करणार- शुध्द आणि मुबलक पाणी- समुद्रात सोडल्या जाणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया- फूटपाथवरच्या झोपड्यांचं पुनर्वसन- राजीव गांधी आवास योजनेतून बांधणार 'परवडणारी घरं' – मुंबईत नवी 35 हजार शौचालयं- ई-वेस्टच्या डिस्पोजलसाठी नवा प्लांट

मुंबई कचरा आणि खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आघाडीने केला आहे. मुंबईकरांना मुबलक आणि शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन आघाडीच्या जाहीरनाम्यात असणार आहे. त्यासाठी समुद्रात सोडल्या जाणार्‍या 80 टक्के दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्याची योजना आहे. शहरामध्ये 35 हजार नवी शौचालयं बांधण्यात येणार आहेत. तसेच शहरातल्या ई वेस्टचं डिस्पोजल करण्यासाठी नवा प्लाँट उभारण्याचीही योजना आहे.

त्यानंतर एमयुआयपी (MUIP) च्या माध्यमातून मुंबईतल्या फूटपाथवरच्या झोपड्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. तसेच राजीव गांधी आवास योजनेतून मोठ्या संख्येने परवडणारी घरं बांधण्याचीही योजना आहे. याखेरीज 2000 सालापर्यंतच्या मुंबईतल्या झोपड्यांना पूर्ण संरक्षण देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चारही या आघाडी जाहीरनाम्यात केला जाणार आहे.

मुंबईतला मराठी माणूस केंद्रस्थानी ठेऊन आघाडीनं सेना भाजप रिपाई महायुतीचा अजेंडा आणि मनसेचं मराठी कार्ड पळवण्याचीही योजना आखलेय.

आघाडीचा डोळा मराठी मतांवर

- बँका, रेल्वे, इन्कम टॅक्स, एक्साईज अशा खात्यांमध्ये नोकर्‍या- मराठी तरुणांच्या प्रशिक्षणाची फी सरकार उचलणार- कोळीवाडे, गावठाणातल्या जुन्या इमारती, बीडीडी, बीआयटी चाळींचं पुनर्वसन- 300 ऐवजी 500 चौरस फुटांची घरं देणार- मुंबईतल्या मराठी शाळांचं आधुनिकीकरण- मुंबईतल्या बंद पडलेल्या 22 मराठी ग्रंथालयांचे पुनरुज्जीवन- प्रत्येक वॉर्डात ई-लायब्ररीची सेवा मराठी माणसाच्या विकासाचा जागर तर प्रत्येक पक्ष करतोय, पण कुणाच्या जाहीरनाम्याला मुंबईकर पसंती देतात ते निवडणूकीनंतर दिसेल.

close